भारत – चीन संघर्षाबाबत पंतप्रधानांच्या विधानांचे खोडसाळ विश्लेषण करून प्रश्न विचारले जाताहेत


  • सैन्याचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल
  • मोदी सरकारचा खुलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत भारत – चीन संघर्षावर केलेल्या विधानांचे खोडसाळ विश्लेषण करून प्रश्न विचारले जात आहेत, असे सरकारने आज स्पष्ट केले.

चीनला भारताने एक इंचही भूमीवर आक्रमण करू दिलेले नाही. आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला आहे, असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले. पण या वक्तव्यावर राहुल गांधी, पी. चिदंबरम, प्रशांत किशोर या नेत्यांनी वेगवेगळे ट्विट करून प्रश्न उपस्थित केले.

वास्तविक पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यात कुठेही संदिग्धता नाही. तरीही खोडसाळ विश्लेषण करून त्यांच्या वक्तव्याचे विपरित अर्थ काढले जात आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सीमेवर घुसखोरी झाली नाही तर २० जवान कसे मारले गेले?, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. तर पंतप्रधान चीनला क्लीन चिट का देत आहेत, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला. प्रशांत किशोर यांनीही अशाच आशयाचा प्रश्न उपस्थित केला.

मात्र पंतप्रधानांचे वक्तव्य पूर्ण आणि नि:संदिग्ध आहे. त्यात कुठेही शंका उपस्थित करण्यासारखे काही नाही. भारतीय सैन्य दलाने आपले काम चोख बजावले आहे. असे असताना आपल्या सैन्याचे मनोधैर्य कमी करण्यासाठी खोडसाळ आणि चुकीचे प्रश्न विचारले जात आहेत, पण हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे सरकारने म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था