भाजपचेच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; नवाब मलिकांनी सोडली “राजकीय पुडी”


“राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये येण्याच्या अफवा तोच पक्ष पसरवतोय”


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी “राजकीय पुडी” सोडून दिली आहे, की भाजपचेच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकमेकांचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. त्यातच नवाब मलिक यांनी एक “राजकीय पुडी” सोडून दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.

काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरवत आहेत. ही तथ्यहीन आणि चुकीची बातमी आहे. उलट भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर आहेत. पण याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरत निर्णय घेऊन माहिती सार्वजनिक केली जाईल, असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था