- देशवासीयांशी संवाद साधताना मोदींनी दिले उदाहरण
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान एका देशाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असे सांगितले. यानंतर हे पंतप्रधान नेमके कोणत्या देशाचे आहेत याचा शोध घ्यायला गुगलवर झुंबड उडाली.
मोदींच्या भाषणात उल्लेख झालेले पंतप्रधान आहेत बल्गेरियाचे.
बल्गेरियाचे पंतप्रधान बॉयस्को बोरिस्कोव्ह हे एका चर्चमध्ये भेटीसाठी गेले होते. यावेळी बॉयस्को यांनी मास्क लावलेला नव्हता, त्यामुळे आपल्याच सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉयस्को यांनी ३०० लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) ((भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १३ हजार)) एवढा दंड भरला होता. ब्लेगेरियाच्या आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या चर्चभेटीआधी उपस्थित व्यक्तींना मास्क घालणं बंधनकारक केलं होतं. नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलं होतं. मात्र बल्गेरियाचे पंतप्रधान स्वतःचं मास्क घालण्यास विसरल्यामुळे त्यांनी स्वतः दंड भरला होता.
Bulgarian PM to be fined for not wearing face mask in church https://t.co/WAOod8NSfq pic.twitter.com/scmy7n2BRR
— Reuters (@Reuters) June 23, 2020
यावेळी मोदींनी, लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्सिंग ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व नियम आपण पाळत होतो. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये काही लोक हे नियम पाळत नसल्याचे पहायला मिळतेय. काही लोक सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालून जाणे टाळत आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्याला नागरिकांनीही साथ द्यायला हवी. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठे नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.