राम मंदिराला शुभेच्छा दिल्याबद्दल हसीन जहाँला बलात्काराची धमकी

  • हसीन जहाँची पोलिसांत तक्रार; मोदी – शहा – ममतांनाही संरक्षणासाठी साकडे

वृत्तसंस्था

कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याची पत्नी हसीन जहाँने राम मंदिर भूमिपूजनाच्या हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या त्यावरून तिला जिहादी मानसिकतेच्या लोकांनी बलात्काराची धमकी दिली. यावरून भडकून तिने कोलकता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडे संरक्षण मिळण्यासाठी साकडे घातले आहे.

हसीन जहाँ मॉडेल आहे. महंमद शामी आणि ती दोघे बऱ्याच काळापासून विभक्त रहात आहेत. मात्र ती नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. त्यामुळे आपले बोल्ड फोटो शूट, व्हिडिओमुळे सोशल मीडियावर कायम ती चर्चेचा विषय ठरते. तिने राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या हिंदू समाजाला सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. यावरून जिहादी मानसिकतेच्या लोकांनी तिला बलात्काराची धमकी दिली. त्या विरोधात तिने कोलकाता के लाल बाजार पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली.

त्याच वेळी तिने मोदी, अमित शहा, पश्चिम ममता बँनर्जी यांना संरक्षण देण्यासाठी आवाहन केले आहे. कोलकात्यात आपण यूपीपेक्षा सुरक्षित असल्याची मल्लिनाथीही हसीन जहाँने केली आहे.

बुधवारी आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावर हसीन जहांने एक पोस्टर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. हसीन जहाँने शेअर केलेल्या फोटोत प्रभू श्रीराम आणि राम मंदिराचा फोटो दिसत आहे. हा फोटो शेअर करत हसीनने राम मंदिर भूमीपुजनासाठी सर्व हिंदू समाजाला शुभेच्छा असे कॅप्शन दिलं आहे. असे केल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून कट्टरपंथी चाहत्यांनी तिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*