- इस्रायली ‘बराक’ भारतीय सीमेवर होणार तैनात
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलबरोबर चांगले संबंध निर्माण केल्याचा फायदा आता चीनबरोबरील संघर्षात मिळणार आहे. बराक-८ लांब पल्ल्यावर मात करणारी जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा आहे. चीनच्या नौदलाच्या हालचालींना या यंत्रणेमुळे चाप बसणार आहे. त्याच बरोबर घातक कमांडो फोर्सची तैनाती सैन्य कारवाईला मोठे बळ प्राप्त करून देणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षानंतर सीमेवर सैन्य आणि युद्धसामग्रीची जमवाजमव करताना इस्रायली बराक क्षेपणास्त्रे आणि घातक कमांडो फोर्सच्या जवानांची तैनातीकडे चाललेली वाटचाल यातून चीन विरोधात मोठी सैनिकी करण्याचा मनसूबा अधोरेखित होतोय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलबरोबर चांगले संबंध निर्माण केल्याचा फायदा आता चीनबरोबरील संघर्षात मिळणार आहे. बराक-८ लांब पल्ल्यावर मात करणारी जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा आहे. चीनच्या नौदलाच्या हालचालींना या यंत्रणेमुळे चाप बसणार आहे.
भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने ही यंत्रणा भारताला देण्याची तयारी दर्शविली आहे. शस्त्रास्त्रे आणि तांत्रिक रचना, अल्ट्रा सिस्टीम आणि अन्य बाबींचा विकास इस्रायल करणार आहे.
भारत डायनेमिक्स लिमिडेट (बीडीएल) क्षेपणास्त्रांचे उत्पादन करणार आहे. ही यंत्रणा युद्ध नौकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची आहे. हिंदी महासागरात चीनच्या नौदलाची हालचाल वाढली आहे. त्यादृष्टीने ‘बराक-८’ भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
भारत-इस्रायलमध्ये नेव्ही व्हर्जन खरेदी करण्याबाबत वर्ष २०१८ मध्ये एक करार करण्यात आला आहे. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारताने आता जमिनीवरून मारा करण्यात येणाऱ्या एअर लाँच व्हर्जन खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया वेगवान केली आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) २०१८ मध्ये सांगितले होते की, भारताने जवळपास ५६८७ कोटी रुपयांच्या ‘बराक-८’ मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे.
‘बराक-८ क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असतात, काही क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असतात. त्यामध्ये मध्यम पल्ला, लांब आणि लहान अंतरावर मारा करण्यास सक्षम अससतात. इस्रायलकडून येणारी सुरक्षा प्रणाली ही लांब पल्ल्यावरील अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
त्याच बरोबर घातक कमांडो फोर्सच्या जवानांची तैनातीही सीमेवर करण्याची तयारी सुरू आहे. बेळगावमध्ये या जवानांचे ट्रेनिंग झाले आहे. गलवानमध्ये हिंसक संघर्ष करण्यापूर्वी चीनी सैनिकांना मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर घात कमांडो फोर्सच्या जवानांची तैनाती सीमेवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये या जवानांची निवड करण्यात येऊन प्रचंड कष्टाच्या ट्रेनिंगनंतर त्यांची घातक कमांडो फोर्समध्ये नियुक्ती करण्यात येते. हे जवान एकास एक किंवा एकास अनेक युद्धतंत्रात तरबेज असतात. त्यांची सीमेवरील तैनाती चीनी सैनिकांना भारी ठरणार आहे.
सीमेवर आधीच हवाई गस्त वाढविण्यात आली आहे. सुखोई, चिनूक्स तैनात आहेत. माऊंटन फोर्स, बोफोर्स तोफा, टी ९० रणगाडे तैनात झाले आहेत. त्यात इस्रायली बराक क्षेपणास्त्रे आणि घातक कमांडो फोर्सच्या जवानांच्या तैनातीची भर पडणार असल्याने भारतीय बाजू आणखी बळकट होणार आहे.