बच्चू कडूंच्या भावना रास्त,चौकशी होईल,कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : जलसंपदा राज्यमंत्री बच्चा कडू यांच्या भावना रास्त आहेत, त्याची दखल आम्ही घेतला आहे, त्याबाबत चौकशी केली जाईल, त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल,त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल, त्याबाबत कारवाई होईल, त्याबाबत निश्चित रहावे,असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बच्चू कडूंना आश्वासन दिले आहे.

श्री.कडू यांनी अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकरी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी पिकांवर कीड आली आहे, अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी माहिती घेऊन पंचनामे करण्यासाठी बांधावर हवे होते,प्रारंभी उगवणीची समस्या होती, त्यानंतर कीडरोगांचा त्रास आहे. याबाबत शेतकरी वर्गात जनजागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाला आहे, अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यांवर यावरून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करीत कृषी विभागावर ताशेरे ओढले होते. यासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या सुचनांची दखल घेतली आहे. त्यांची चौकशी होईल,असे सांगितले.

चौकशी होईलच

कृषीमंत्री भुसे म्हणाले, राज्यमंत्री कडू यांच्या भावना रास्त आहेत, त्यांची दखल आम्ही घेतली आहे. याबाबत चौकशी केली जील, त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल, तसेच कारवाई होईल, कुणीही काळजी करू नये दरम्यान बियाण्यांची उगवणक्षमता,बियाण्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया, त्याबाबतचे प्रयोग व निकष यांचा विचार केल्यास यंदा उपलब्ध होणारे बियाणे तीन ते चार वर्षे आधी तयार करण्याची प्रक्रीया सुरु झालेली असते.

त्याबाबत कोणती व कशी कार्यवाही, चाचण्या घ्याव्यात हे केंद्र शासन ठरवते. यंदा अचानक बियाण्यांची मागणी वाढली. ती पूर्तता करतांना धावपळ झाली. शेतकरी वर्गात स्वतःच्या शेतातील बियाणे वापरण्याचे प्रमाम लक्षणीय आहे, त्या तुलनेत महाबीज सारख्या शासकीय संस्थांचा बियाणे विक्रीतील सहभाग पाच ते दहा टक्के एवढा मर्यादित आहे,असेही ते म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*