प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आता महिला सैनिक होणार तैनात


भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांची प्रथमच सक्रिय ड्यूटीसाठी नियुक्ती करून सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांची प्रथमच सक्रिय ड्यूटीसाठी नियुक्ती करून सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

प्रत्येकी १० महिला सैनिकांच्या दोन तुकड्या गेल्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकार्यांकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. महिलांची अंगझडती घेण्याचे कामही त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहेत.

गेल्या जानेवारीत लष्कराने ९९ महिला सैनिकांची भरती केली आहे; पण त्यांचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. दरम्यान, लष्करात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’वर सेवा देणार्या महिला अधिकार्यांना ‘पर्मनंट कमिशन’ देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

नुकतीच शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या महिला आधिकार्यांना भारतीय लष्करातील सर्व १० विभागांमध्ये कायमस्वरूपी परवानगी मिळाली आहे. लष्करातील महिलांच्या कायमस्वरूपी कमिशनला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे मंजुरी दिली होती.

या संदर्भात केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर लष्करातील वरच्या विविध स्तरांवर महिलांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या आदेशानुसार, शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या महिला अधिकाऱ्याना भारतीय लष्कारातील सर्व १० विभागांमध्ये कायमस्वरूपी परवानगी मिळाली आहे. याचाच अर्थ, आता लष्कर, हवाईदल, सिग्नल इंजिनीअर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, आर्मी सर्व्हीस कॉर्प्स, आर्मी आॅर्डिनन्स कॉर्प्स आणि इंटेलिजन्स कॉर्प्समध्ये देखील कायमस्वरुपी कमिशन मिळणार आहे. या आदेशानंतर आता लवकरच पर्मनंट कमिशन निवड मंडळाकडून महिला अधिकार्यांची नियुक्ती होणार आहे.

देशाच्या लष्करात महिलांचा वाटा ३.८ टक्के इतका आहे. हवाई दलात मात्र, महिलांचा १३ टक्के इतका वाटा आहे. नौदलात ६ टक्के इतका वाटा आहे. भारतीय लष्करात पुरुष अधिकार्यांची संख्या ही ४० हजारांच्या वर आहे. महिला अधिकार्यांचे प्रमाण हे दीड हजार इतकेच आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था