पुरी रथयात्रेबाबत पंतप्रधानांनी भाविकांच्या भावना जाणल्या; अमित शहा यांच्याकडून कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांच्या भावना जाणून विचार केला. त्यामुळे जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेची महान परंपरा कायम राहिली, अशा शब्दांत गृह मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांच्या भावना जाणून विचार केला. त्यामुळे जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेची महान परंपरा कायम राहिली, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. पुरी रथ यात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेला परवानगी नाकारली होती. परंतु, न्यायालयाने आधीच्या आदेशात बदल करावा यासाठी केंद्र सरकारने अर्ज केला होता. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. दिनेश महेश्वरी व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ सुनावणी झाली.

सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी म्हणाले की, रथयात्रा होऊ दिली तर भगवान जगन्नाथही आम्हाला माफ करणार नाही. आम्ही मर्यादित स्वरूपात यात्रेस परवनागी देऊ. रथयात्रेच्या काळात पुरीमध्ये संचारबंदी लागू होणार आहे. यात्रेत फक्त सेवेकरी सहभागी होतील. लाखोंच्या संख्येने सहभागी होणार्या भाविकांना मात्र यात्रेत पूर्ण मज्जाव असेल. परंतु, त्यांना टीव्हीवरून यात्रेचा आनंद घेता येईल.

याबाबत केलेल्या ट्विट संदेशात अमित शहा म्हणाले, आजचा दिवस आपणा सर्वांसाठी, विशेषत: आपल्या ओदिशाच्या बंधू-भगिनी त्याचबरोबर महाप्रभू श्री जगन्नाथ जी यांच्या भाविकांसाठी विशेष आहे. रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

शहा म्हणाले, माझ्याबरोबरच भारतातल्या कोट्यवधी भाविकांसाठी ही आनंदाची बाब आहे. हा मुद्दा सोडवण्यासाठी संबंधीताशी तातडीने चर्चा करण्यात आली. काल संध्याकाळी, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार गजपती महाराज (पुरीचे राजे) आणि पुरीचे आदरणीय शंकराचार्य यांच्याशी चर्चा केली. यात्रेबाबत त्यांची मते जाणून घेतली. आज सकाळी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सॉलीसिटर जनरल यांच्याशीही आपण चर्चा केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

या बाबीची तातडी आणि महत्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन पीठासमोर हा मुद्दा  ठेवण्यात आला आणि आज दुपारी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्वाच्या निर्णय आपल्यासमोर आला. ओदिशाच्या जनतेचे अभिनंदन. जय जगन्नाथ ! असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती