पुणे-इंदूर रेल्वे प्रकल्पातपासून चीनी कंपन्या दूर,दादांना सूचले उशिरा शहाणपण


विशेष प्रतिनिधी

नाशिक : आपल्या कामातील अपयश लपविण्यासाठी ठाकरे सरकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतांना दिसत आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तर माहीरच आहे. केंद्र शासनाने आपल्या प्रकल्प,कामांतून केव्हाच चिनी कंपन्यांना थारा द्यायचे नाही असे ठरवत सर्व कामे रद्द केली,करार रद्द केले, हे बघून आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पाच्या कामात चीनी उत्पादने किंवा सेवाना स्थान द्यायचे नाही,असे अजित पवारांनी ठरविले आहे.

कोरोना विषाणूचा फैलावानंतर भारतासह जगभरातून चीनी कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांना बायकॉट केले जात आहे. भारतात या मोहिमेने आता वेग धरला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेट कार्पीरेशन लिमिटेड तथा महारेलतर्फे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण झाले.

हा अपयशी ठाकरे सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला जात आहे. कोरोनाचे संकट असलेतरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू,असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे पुणे,अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती