पश्चिम बंगालला ग्रहण, लोकशाही आंदोलने दडपतेय ममता सरकार, जे. पी. नड्डांचा आरोप


पश्चिम बंगालला विनाशाचे ग्रहण लागले आहे. येथील ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकशाही आंदोलने दडपत आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तनाची गरज असल्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे  अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालला विनाशाचे ग्रहण लागले आहे. येथील ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकशाही आंदोलने दडपत आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तनाची गरज असल्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमार परिवार, बीजेपी परिवार या सदस्यता अभियानाचे उद्घाटन करताना नड्डा बोलत होते. आपल्या व्हिडीओ मेसेजमध्ये नड्डा म्हणाले, पश्चिम बंगालमधील सध्याचे सरकार कुशासनाने ग्रासले आहे. यामुळे बंगालचा आर्थिक पायाच ढासळला आहे. सामाजिक मूल्ये कमी झाली आहेत. राज्यातील व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही. यासाठी होणारी लोकशाही आंदोलने दडपून टाकली जात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला उचित मूल्य मिळत नाही. चीनी व्हायरसने संक्रमित झालेल्या गरीबांना जगणे सुसह्य व्हावे यासाठी पंतप्रधशन नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य पाठविले. मात्र, सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचार करून हे धान्य मधल्यामध्ये हडप केले. केवळ दलालांच्या माध्यमातून सरकार चालले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था उखडली आहे, असा आरोप नड्डा यांनी केला.

चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधाच नसल्याचे सांगून नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या. वंचित, पीडितांसाठी असलेल्या या योजना पश्चिम बंगालच्या सरकारने राज्यात लागूच केल्या नाहीत. ज्या योजना लागू केल्या त्यादेखील अर्ध्यामुर्ध्याच आहेत. स्थानिक पातळीवर प्रचंड भ्रष्टाचार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या.

अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे आता या कुशासनाचा अंत करण्याची वेळ आली आहे. या सगळ्याविरुध्द लढण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता कटिबध्द आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती