पंतप्रधान मोदींच्या पुतीनना शुभेच्छा, भारत-रशिया मैत्रीचे ऋणानुबंध आणखी घट्ट

रशियाने दुसऱ्या जागतिक युध्दात मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाचा अमृतमहोत्सव आणि अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची २०३६ पर्यंत झालेली अध्यक्षपदी निवड यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या दोन्ही आंतरराष्ट्रीय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे भारत-रशिया मैत्रीचे ऋणानुबंध आणखी घट्ट झाले. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी राजनैतिक पातळीवर ही मोठी घटना मानली जात आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशियाने दुसऱ्या जागतिक युध्दात प्राप्त केलेल्या दैदिप्यमान विजयाचा अमृतमहोत्सव आणि अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची २०३६ पर्यंत झालेली अध्यक्षपदी निवड यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या दोन्ही नेत्यांनी नुकताच एकमेकांशी संवाद साधला. या चर्चेमुळे भारत-रशिया मैत्रीचे ऋणानुबंध आणखी घट्ट झाले. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी राजनैतिक पातळीवर ही मोठी घटना मानली जात आहे.

निवडणुकीतील विजयानंतर पुतीन यांना सर्व प्रथम शुभेच्छा देणारे मोदी हे पहिले नेते ठरले. या चर्चेत भारत आणि रशियातील सामरिक संबंध अधिक दृढ होतील, असं पुतीन यावेळी पंतप्रधानांना म्हणाले.

चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांचे महत्व भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, २४ जूनला झालेल्या सैन्याच्या  संचलनात भारतीय जवानांनीही भाग घेतला होता. दोन्ही देशांच्या मैत्रीचे हे प्रतीक आहे. दोन्ही देशांमध्ये सर्वच क्षेत्रात रणनितीक भागिदारी पूर्ण करण्यास रशिया कटिबद्ध आहे, असे सांगतानाच चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत  भारताला लवकरात लवकर एस-400 ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देण्याची रशियाने तयारी दर्शवली आहे.

भारत आणि रशियामध्ये २०१८ मध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक अशा एस-400 या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा करार झाला होता. या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी ५ अब्ज डॉलर अर्थात ४० हजार कोटी रुपयांचा करार भारताने रशियासोबत केली. भारत या क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच युनिट्स खरेदी करणार आहे.

याशिवाय भारत टी-९० रणगाड्यांच्या महत्त्वाच्या सुट्या भागांसाठीही भारताने रशियाशी बोलणी केली आहे. रशियाकडून भारत ३३ लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली. रशियाकडून भारत सुखोई-३० आणि मिग- २९ ही आधुनिक विमानं खरेदी करणार आहे. यासाठी १८ हजार १४८ कोटींची तरतूद केली गेली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*