निवडणुकांत अ‍ॅनालिटिका, फेसबुकचा वापर करणाऱ्यांकडून निर्लज्जपणे भाजपावर आरोप, रविशंकर प्रसाद यांचा पलटवार

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवरून भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसवर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिक आणि फेसबुकचा सर्रास वापर करणारे आणि रंगेहाथ पकडले गेलेले, ते लोक आता निर्लज्जपणे भाजपावर खोटे आरोप करीत आहेत, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केली आहे.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवरून भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसवर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिक आणि फेसबुकचा सर्रास वापर करणारे आणि रंगेहाथ पकडले गेलेले, ते लोक आता निर्लज्जपणे भाजपावर खोटे आरोप करीत आहेत, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केली.

राहुल गांधी यांनी फेसबुक भाजपाच्या नियंत्रणात असल्याचा आरोप केला होता. त्यावर ट्विटरवरून उत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले, निवडणुका आल्यानंतर समाजमाध्यमांवरील माहिती चोरून त्याचा शस्त्रासारखा वापर तुमच्या कॉंग्रेसनेच केला होता. या चोरीत तुम्ही रंगेहाथ सापडला होतात. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिक आणि फेसबुकवर तुमचे कसे नियंत्रण होते, हे जगाला सांगण्याची गरज नाही आणि आता हेच लोक अतिशय निर्लज्जपणे भाजपावर आरोप करीत आहेत, असे प्रसाद यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात लिहिणे आणि बोलण्याची चोरी झाली आहे, असा आरोप केला होता. लिहिणे आणि बोलणे देखील आज गुन्हा ठरत आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य दाबले जात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यावर उत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले, वस्तुस्थिती अशी आहे की, आज मोदी सरकारच्या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणखी मजबूत झाले आहे. प्रत्येक व्यक्ती आपले मत निर्भयपणे व्यक्त करीत आहे.

आता एका परिवाराद्वारे सरकारची सूत्रे संचालित केली जात नसल्याने आणि आपल्या मर्जीप्रमाणे सरकारचे कामकाज चालविता येत नसल्याने, कदाचित तुम्हाला दु:ख होत असेल.

बंगळुरूत एका समाजाच्या जमावाने तुमच्याच आमदाराचे घर जाळले, हिंसाचार केला. यात तिघांना जीव गमवावा लागला. मात्र, यावर तुमच्याकडून अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही, असा चिमटाही प्रसाद यांनी कॉंग्रेसला काढला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*