नाशिकमध्ये ३६ हजार हाय् रिस्क नागरिक,कोरोना रूग्णांची संख्या २३ हजारावर

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढतांना दिसत आहे. नाशिक शहरात मिशन झिरो नाशिक ही मोहिम सुरु आहे. त्यात घरोघर जाऊन तपासण्या सुरु आहेत. दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या सध्या तेवीस हजार ३७१ झाली आहे. यापैकी सतरा हजार ५९० रूग्ण हे पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या जिल्ह्यात ३६ हजार हाय रिस्क नागरीक असून उपचार घेत असलेले पाच हजार ११५ रूग्ण आहेत.

नाशिक प्रत्येक प्रभागातील नगरसेवक,स्वयसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांचा तपासण्या करण्यात सहभाग आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात सरासरी शंभर रूग्णांची तपासणी केली जाते. त्यात दोन ते तीन टक्के आढळल्याने रूग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते.

संसर्ग नियंत्रणात येईल

शहरात केलेल्या तपासण्यांत पंचावन्न हजार ९६२ नागरीक निगेटिव्ह आढळले. तीन हजार २०३ कंटेनमेंट झोन आहेत. या झोनमध्ये रूग्ण व त्यांच्या संपर्क,कुटुंबातील सदस्य असे शहरातील या तपासण्यांत महापालिकेने छत्तीस हजार ६०६ हाय रिस्क तर बास्ष्ट हजार १७० लो रिस्क नागरीक आहेत, जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फेत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सतरा हजार ५८० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत ६७६ रूग्णांचा मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जास्तीत जास्त तपासण्या होत असल्याने लवकरच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईल,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

जिल्ह्यात बरे होण्याची टक्केवारी

नाशिकच्या ग्रामीण भागात ७३.४८ टक्के,शहरात ७६.२१ टक्के,मालेगावमध्ये ७१.२३ टक्के आहे तसेच जिल्यात रूग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ७५.२२ टक्के इतके आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील १७४, नाशिक शहरात ३८६.मालेगाव शहरात९५ तर जिल्हा बाहेरील २१ अशा ६७६ रूग्णांचा मृत्यु झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*