नाशिकमध्ये रामभक्तांवर ठाकरे-पवार सरकारची कारवाई; देवयानी फरांदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


विशेष प्रतिनिधी

नाशिक :अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिक शहरात रामभक्ताकडून विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी नाकारतांना संबंधीत रामभक्त,कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा आमदार प्रा.देवयांनी फरांदे यांनी निषेध केला असून तसे पत्र अपयशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे.

बुधवारी(ता.५) राम जन्मभूमी शिलान्यासाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नाशिक शहरात रामभक्तांनी विविध कार्यक्रम घेतले, आमदार फरांदे व त्यांच्या सहकार्यांनी गोदावरीवर आरती केली. पण पोलिसांनी हा कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रम होऊ दिले नाही, व उलट संबंधीतांवर कारवाई केली.

या घटनांचा फरांदे यांनी निषेध नोंदवत तसे पत्र दिले आहे, नाशिक पोलिसांकडून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्यातआली. कार्यक्रमांसाठी परवानगी मागितली असता पोलीसांनी घरी जावून नाकारल्या. यामागे दहशत निर्माण करण्यांचा प्रयत्न होता. काळाराम मंदीरातील पोलिस बंदोबस्त प्रभू श्रीरामालाच बंदीस्त करण्याचा प्रकार असल्याचे पत्रात म्हटले, पोलिसांवर कारवाईची मागणी फरांदे यांनी केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती