नाराजीनामा सुरु,काँग्रेस आमदारांची अन्यायाची भावना, निधीच्या असमानतेबद्दल अशोक चव्हाणांकडे तक्रार

विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाआघाडी सरकारमधील नाराजीनामा सुरु झाला असून त्यांचा लवकरच स्फोट होईल.अशी चिन्ह दिसू लागली आहे. जळगावचे कॉग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी त्यासाठी सरकारबद्दल आपला असंतोष व्यक्त केला आहे. आपले सरकार असल्यामुळे त्याबाबत जाहीर वाच्यता करू नये, ही आपली कामाची पध्दत आहे. निधी असमानता असल्याबाबतचे लेखी पत्र आपण अगोदरच पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना दिले आहे.

सरकार जरी तीन पक्षाचे असलेतरी कामाच्या पध्दतीबाबत सर्वांनाच समान न्याय मिळायला हवा, कुणावरही अन्याय होता कामा नये, असे चौधरी यांना वाटते. त्यामुळे आपल्या पध्दतीनुसार आपण लेखी लिहून महाविकास आघाडीतील समन्वय समितीचे पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना कळविले आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व पक्षातील आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, अशी आपण पत्रात मागणी केली आहे.

पक्षाच्या नेत्यांना न्याय द्यावा

विकास कामाच्या निधीत असमानता असल्याचे आपल्याला दिसून आले,त्याच वेळी आपण हे लेखी पत्र लिहीले आहे, सत्ताधारी पक्षातील आमदारांना मतदार संघात काम करण्यासाठी निधी समान मिळाला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे आमच्यावर अन्याय होत आहे हे निश्चित आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत असलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांनी याबाबत न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे.

त्यांनी याबाबत आघाडीतील इतर पक्षाशी नेत्यांनी चर्चा करून कॉग्रेसच्या आमदारांवर निधीत अन्याय होणार नाही. याची दक्षात घ्यावी, निधीबाबत अधिवेशनाच्या अगोदर निर्णय हील,असे मत व्यक्त करून आमदार चौधरी म्हणाले, की अधिवेशनाच्या अगोदर आम्ही कॉग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन चर्चा करू, त्यानंतर निश्चित याबाबत निर्णय होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*