नापाक मनसुबे उधळून लावा, चोख प्रत्युत्तर द्या, लष्करप्रमुखांच्या सूचना


नापाक मनसुबे उधळून लावा. पाकिस्तनाच्या कुठल्याही कुरापतीला चोख प्रत्युत्तर द्या, अशा सूचना लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विरोधकांकडून छुपे युद्ध केले जात आहे. त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी एकजुटीने काम करत राहू, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.


वृत्तसंस्था

पठाणकोट : नापाक मनसुबे उधळून लावा. पाकिस्तनाच्या कुठल्याही कुरापतीला चोख प्रत्युत्तर द्या, अशा सूचना लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विरोधकांकडून छुपे युद्ध केले जात आहे. त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी एकजुटीने काम करत राहू, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

जम्मू-पठाणकोट भागाचा दौरा करताना लष्करप्रमुख बोलत होते. जनरल नरवणे यांनी सीमेवर आघाडीवर तैनात असलेल्या रायझिंग स्टार कॉर्प्सच्या तैनात जवानांची, सुरक्षा व्यवस्था आणि कारवाईच्या तयारी संबंधी माहिती घेतली. लष्कर प्रमुखांनी गुर्ज डिव्हिजनमधील आघाडीवरील भागाचाही दौरा केला.

पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येत आहे. तसंच दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी प्रयत्न केला जात आहे. पाकच्या कुठल्याही कुरापतीला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे. सरकार आणि लष्कराच्या सर्व सुरक्षा यंत्रणा मिळून काम करत आहेत, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

शत्रूचा कुठलाही हल्ला परतावून लावण्यात आणि परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आपले लष्कर सक्षम आहे. करोना व्हायरस विरोधी लढाईत लष्कराच्या पश्चिम विभागाने केलेल्या प्रयत्नांचे आणि ‘ऑपरेशन नमस्ते’चे कौतुक लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था