नया है वह`,म्हणत अपयशी भुजबळांकडून पार्थबाबत मार्मिक टिपणी, पवार कुटूंबात नाराजी नसल्याचे दिले स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

नाशिकः सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत नाशिकचे अपयशी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी `नया है वह` म्हणत मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रीया दिली. पवार कुटूंबात सर्व ठिकठाक आहे, कुणी काळजी करण्याची गरज नाही,असे ते म्हणाले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टिका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली याहे, शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही,अशा शब्दांत बुधवारी फटकारलं, दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रीया देतांना नया है वह,अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.

पवार कुटुंबात कोणीही नाराज नाही

शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची,सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी हे थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झाल तर ‘नया है वह’ असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी पवार कुटुबीयांमध्ये कोणतेही वाद नसल्याचं सांगितलं. सुशांत सिंह प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही,असं म्हणतं भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*