धुळ्यात पक्ष निरिक्षकांसमोरच राष्ट्रवादीचे नवे जुने,भिडले,बैठकीत उफळला वाद

विशेष प्रतिनिधी

नाशिक : धुळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बैठकीत गट-तट आणि नव्या-जुन्यांचा वाद पक्षाच्या निरीक्षकांसमोरच उफाळून आला. चांगलीच खडाजंगी झाली. बैठकीला कार्यकर्त्यांची गर्दी पाहून पदाधिकाऱ्यांना समाधान वाटले होते, एवढेच नव्हे तर बैठकीला लाभलेल्या अशा प्रतिसादामुळे येथुनच पक्षाचा आमदार,खासदार निवडला पाहिजे, असे क्षणभर पक्षनिरीक्षकांना वाटले, त्यांनी ही बाब बोलूनही दाखवली. पण ज्यावेळेस अंतर्गत वाद सुरु झाले त्यावेळी मात्र सर्वांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे सांगत बैठकच आटोपती घेण्यात आली.

राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस सत्तेत असल्याने स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्यांचा हुरूप वाढला आहे. हेच औचित्य साधून पक्षाचे निरीक्षक अर्जुनराव टिळे व अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात बैठकीच्या निमित्ताने नवे-जुने कार्यकर्ते,पदाधिकारी असा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती, जुन्यांना पदांवरून बाजूला सारण्याचे प्रकार घडत असल्याने वादाला आमंत्रण मिळत असल्याचा वर्तुळात सुरु आहे. पक्षातून भाजपमध्ये गेलेल्यांच्या इशाऱ्यांवर चालणाऱ्यांना राष्ट्रवादीत स्थान देऊ नये,अशी मागणीही बैठकीत झाली.

गट-तट मुंबईला

पक्षातील विविध गट-तटाचे पदाधिकारी समर्थकांसह कोरोनाच्या संकटकाळातही मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत होते, त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांच्या नेमक्या भावना जाणून घेण्यासाठी निरीक्षक टिळे व आदिक यांना पाठविले होते. ते बैठकीत कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सुखावले,मात्र गट-तट,जुने-नवे वाद पाहून नाराज झाले. राष्ट्रवादी भवनात नवे-जुने,गटा-तटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बरीच खडाजंगी झाली. त्यामुळे निरीक्षकांनी दालनात स्वतंत्रपणे संवाद साधला.

एकनिष्ठांचा सत्कार,इतरांना डावलले

राष्ट्रीय नेते पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून त्यांना साथ देणारे आणि कल्याम भवन परिसरातील ज्या वृक्षाखाली १९९९ ला जिल्हा शाखेची स्थापना झाली. त्यावेळेपासून एकनिष्ठ असलेले एन.सी.पाटील,जोसेफ मलबारी,सलाम मास्टर, अंड.रविंद्र पाटील,भोला वाघ,ए.बी.पाटील,शकिल ईसा,नवाब बेग,नंदू येलमामे,ज्ञानेश्वर पाटील आदींचा सत्कार झाला. निरीक्षकांच्या हस्ते शहरात ५० टक्के सवलतीत वह्या वाटपाच्या उपक्रमास सुरवातही झाली

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*