मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना धमकीचे फोन आले आहेत. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना धमकीचे फोन आले आहेत. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही दुबईहून धमकीचे फोन आले असून मुंबई पोलिसांची क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे.
गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर किमान दहा वेळा फोन आले आहेत. तर मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान आलेल्या मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर पाच-सात वेळा फोन आले. सर्व फोन भारताबाहेरून आणि एकाच नंबरहून आले आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ वर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दुबईतून फोन करून धमकी दिली होती.
राज्यातील प्रमुख नेत्यांना असे फोन आल्याने मुंबई पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. मात्र, हे फोन खरेच आलेत की कोणीतरी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे, अशी शंका व्यक्त करून त्याची चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.