द्रमुक देशहितविरोधी, राष्ट्रविरोधी भावनांना नेत्यांकडून खतपाणी, जे. पी. नड्डा यांचा आरोप

आघाडीच्या राजकारणाच्या अपरिहार्यतेमुळे आजपर्यंत कॉंग्रेसच्या सरकारांनी डोळ्याआड केलेल्या द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) या पक्षाच्या राष्ट्रविरोधी भावनेवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हल्ला केला आहे. ‘द्रमुक पक्ष सातत्याने देशहितविरोधी काम करण्यासाठी लोकांना चिथावणी देतो. त्यांचे नेते राष्ट्रीय भावनेविरोधी भावनांना खतपाणी घालतात,’ असा आरोप त्यांनी केला आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आघाडीच्या राजकारणाच्या अपरिहार्यतेमुळे आजपर्यंत कॉंग्रेसच्या सरकारांनी डोळ्याआड केलेल्या द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) या पक्षाच्या राष्ट्र विरोधी भावनेवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हल्ला केला आहे.

‘द्रमुक पक्ष सातत्याने देशहितविरोधी काम करण्यासाठी लोकांना चिथावणी देतो. त्यांचे नेते राष्ट्रीय भावनेविरोधी भावनांना खतपाणी घालतात,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

श्रीलंकेतील तामीळ दहशतवाद्यांना द्रमुकचा पाठिंबा असल्याचे उघड सत्य आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांनाही द्रमुकने पाठिंबा दिला होता. मात्र, कॉंग्रेसने आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता म्हणून सत्ता टिकविण्यासाठी द्रमुकच्या देशहितविरोधी कारवाया डोळ्याआड केल्या. परंतु, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी द्रमुकचा खरा चेहरा पुढे आणला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना त्यांनी पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, द्रमुक सातत्याने देशविरोधी भावनेला खतपाणी घालतो. देशाच्या मुख्य प्रवाहातील एकजीवपणा कसा विस्कळित होईल, यावर त्यांचा भर असतो. ते विकासविरोधी आहेत. ते देशहितविरोधी आहेत. तमिळनाडूमध्ये फुटीरतावादी शक्तींना बळ मिळणार नाही, याकडे इतरांनीही लक्ष दिले पाहिजे.

कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्रचार करावा, असे आवाहन करताना नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय आत्मा असणारे भारत शैक्षणिक धोरण सादर केले आहे. त्याचा सखोल अभ्यास करावा. तमिळनाडूतील जनता मुख्य प्रवाहात कशी येईल, हे पाहावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. द्रमुकने या धोरणाला विरोध केला आहे.

“बूथ पातळीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन करावेत. पंतप्रधान मोदींची भाषणे तमिळमधून त्यावर व्हायरल करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तमिळला कसे महत्त्व मिळणार आहे, हे तमिळमधूनच जनतेपर्यंत पोहोचवावे. तरुण, महिला, आदिवासी, दलित, पददलित यांना पक्षाकडे अधिकाधिक जोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे,” असेही नड्डा यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*