देशरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य; राम मंदिराच्या बांधकामाला तूर्त स्थगिती


राम मंदिर ट्रस्टकडून भारत – चीन तणावाबाबत चिंता व्यक्त


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : भारत – चीन हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशरक्षणास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका मांडत राम जन्मभूमी ट्रस्टने राम मंदिराच्या बांधकामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

लडाखमध्ये गालवन खोऱ्यात भारत आणि चीन हिंसक संघर्षात २० भारतीयांना हौतात्म्य आले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनेही मोठा निर्णय घेत राम मंदिर उभारणीचे काम तूर्तास थांबविले आहे. राम मंदिर ट्रस्टने ही माहिती दिली.

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाचे आहे, असे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. मंदिराचे बांधकाम सुरू करण्याच्या नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती दिली.

“मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेऊन अधिकृतपणे जाहीर केला जाईल,” अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली. दरम्यान, यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

अयोध्येत विविध हिंदू संघटनांनी चीनविरोधात निदर्शने केली. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी चीनचा ध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला. तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा पुतळा जाळत आणि चिनी वस्तू तोडून संताप व्यक्त केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था