राहुल गांधींची लोकप्रियता सोनिया, प्रियांकांपेक्षा “अफाट”


  • ८७ वर्षांचे डॉ. मनमोहन सिंगही ४८ वर्षांच्या प्रियांकांपेक्षा लोकप्रिय
  • राहुल २३%, सोनिया १४%, प्रियांका १४%, डॉ. मनमोहन सिंग १८%, सचिन पायलट ३%, अशोक गेहलोत २%

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरातील लोकप्रियतेत वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांच्यावर मोठ्या फरकाने “मात” केली आहे. राहुल यांना २३% लोकांनी पसंती दिली आहे. सोनिया आणि प्रियांका यांना प्रत्येकी १४% लोकांनी पसंती दिली आहे. या तीनही नेत्यांच्या लोकप्रियतेच्या तुलनेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देखील स्पर्धेत आहेत. त्यांची लोकप्रियता १८% आहे. अर्थात तीनही गांधींच्या लोकप्रियतेची “बेरीज” केली तर मात्र डॉ. मनमोहन सिंग आपोआप मागे पडताना दिसतात. इंडिया टुडे आणि कार्वी संस्थेने हा सर्वे केला आहे.

राष्ट्रीय स्तरावर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससमोर अनेक आव्हाने दिसत असून, पक्षाध्यपदाचा महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसला सतावताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून पदाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. मात्र, काँग्रेसला राहुल गांधी हेच नवसंजीवनी देतील, असे या सर्वेतून दिसून आले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ६६% आहे.

देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, करोना परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केलं. ‘मूड ऑफ द नेशन २०२० नावाने करण्यात आलेल्या सर्वेत “काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असे तुम्हाला वाटते?,” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना सर्वात जास्त भारतीयांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे. २३ % नागरिकांना वाटते की, राहुल गांधी काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतात. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली आहे. १८% भारतीयांना वाटते की, मनमोहन सिंग यांचे नेतृत्त्व काँग्रेसला उभारी देऊ शकते.

१४% लोकांनी माहिती नाही, असे उत्तर दिले. तर १४ % लोकांना वाटत प्रियंका गांधी या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी योग्य नेत्या आहेत. १४ % लोकांना वाटत सोनिया गांधी काँग्रेस पुन्हा चांगले दिवस आणू शकतात.

या सर्वेत १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती