दूधप्रश्नी महायुतीतर्फे मातोश्री वर पाठवणार पाच लाख पत्रे

विशेष प्रतिनिधी

नाशिक : दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक महायुतीतर्फे देण्यात आली. तसेच उद्या(ता.१४) पासून ते १८ ऑगस्टपर्यत दुध उत्पादकांच्या मागण्यासंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पाठविम्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीतर्फे दोनदा आंदोलन करण्यात आले,पण राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले,मात्र महायुतीतले घटक पक्ष शांत बसणार नाहीत.

शेतकरीबांधवांना असे वाऱ्यावर सोडणार नाही. जोपर्यत त्यांना अनुदान मिळत नाही, तोपर्यत लढण्यासाठी हे दुध आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय काल मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला.असे खोत म्हणाले.

यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर,रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) चे अविनाश महातेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे ऑनलाइन बैठकीसाठी उपस्थित होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*