दारूची दुकाने उघडायला परवानगी देता, तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

दारूची दुकाने उघडायला परवानगी देत आहात, तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दारु दुकानं, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडत आहात. अशा परिस्थितीत मंदिर उघडण्याचा आग्रह असेल, तर तो योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

सातारा : दारूची दुकाने उघडायला परवानगी देत आहात, तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दारु दुकानं, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडत आहात. अशा परिस्थितीत मंदिर उघडण्याचा आग्रह असेल, तर तो योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चीनी व्हायरसचा संसर्ग असलेल्या सातारा, कराड, सांगलीच्या दौऱ्यावर आहेत.

या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संवाद कमी पडत आहे. हे टाळले पाहिजे. मी सरकारवर या परिस्थितीत कोणताही आरोप करणार नाही. परंतु या आजारासाठी जेव्हढं अधिक चांगले करता येईल ते करण्याची गरज आहे. इतर राज्यात मंदिरे उघडली आहेत. आपल्या राज्यात दारू दुकाने, मॉल उघडतायेत तर मंदिरे उघडण्याचा आग्रह काही चुकीचा नाही. मंदिरे उघडल्यामुळे लोक गर्दी करतील हा शासनाचा आक्षेप पूर्ण चुकीचा आहे. लोक आता स्वत: शिस्त पळत आहेत. त्यामुळे अशी काही गर्दी होणार नाही.

फडणवीस म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग राज्यापेक्षा जास्त आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. प्रशासनाने पाचशे बेड असलेल्या कोरोना केंद्र उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. त्याला तातडीच्या मंजुरीची गरज आहे. शासनाने हा प्रस्ताव ताबडतोबीने मंजूर करावा. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*