तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन करून बडबडू नका : नड्डांचा राहुल गांधींना टोला


  • पंतप्रधानांबाबत राहुल गांधींची भाषा दु:संस्कार दाखवणारी
  • भारतीय जवानांचे मनोधैर्य खचवू नका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली / जयपूर : “भारत – चीन संघर्षात आजच्या घडीला भारताचे सैन्य चीनला खणखणीत प्रत्युत्तर देत आहे. मात्र, अशा वेळी काही नेते तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन करत बडबडत आहेत,” असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींना लगावला.

राजस्थान प्रदेश भाजपच्या virtual rally त ते बोलत होते. “आपल्या देशातले काही नेते ट्विट करून आपल्याच सैन्य दलांचे आणि जवानांचे मनोधैर्य खचवत आहेत. तुम्हाला काहीही माहिती नाही तर किमान तुमच्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन तरी करू नका, असा टोला लगावून नड्डा म्हणाले, “तुम्ही सैनिक नि:शस्त्र का गेले होते? असा प्रश्न विचारत आहात.

तुम्हाला काही माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय करार, मुद्दे काही ठाऊक आहेत का? एकतर काही माहिती घ्यायची नाही. तरीही बडबडत सुटायचे. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य खच्ची होते हा विचार तुम्ही करत नाही का? तुम्ही करत असलेले ट्विट्स तुमचे अज्ञान दर्शवत आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनादार दाखवणारी भाषा तुम्ही वापरत आहात. पंतप्रधानांबाबत कुणीही अशा भाषेत बोलत नाही. पण तुम्ही डॉ. मनमोहन सिंग यांनी तयार केलेल्या कायद्याच्या मसुद्याचे कपटे केलेत. तुमचे वागणे तुमच्यावरचे संस्कार दर्शवत आहेत. भारतीय कुटुंबात वाढलेली व्यक्ती कुणाचा असा अपमान करणार नाही. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द बोलत आहात. तुमच्यावरचे दु:संस्कारच तुम्ही दाखवताय, अशी बोचरी टीकाही नड्डा यांनी केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती