चीनने भारतीय जवानांची क्रूर हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधी संताप वाढत आहे. झोमॅटो या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रभक्तीचे उदाहरण देत चीनी गुंतवणूक असलेल्या कंपनीची नोकरी सोडली. त्याचबरोबर झोमॅटोद्वारे फूड डिलिव्हरी ऑर्डर करू नये असे आवाहन केले आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : चीनने भारतीय जवानांची क्रूर हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधी संताप वाढत आहे. झोमॅटो या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रभक्तीचे उदाहरण देत चीनी गुंतवणूक असलेल्या कंपनीची नोकरी सोडली. त्याचबरोबर झोमॅटोद्वारे फूड डिलिव्हरी ऑर्डर करू नये असे आवाहन केले आहे.
कोलकत्ता येथील बौला भागात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत आपले टी-शर्टही जाळले. २०१८ मध्ये, अँट फायनान्शियल या अलिबाबा कंपनीचा एक भाग असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून झोमॅटोमध्ये सुमारे 1588 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि 14.7 टक्के हिस्सेदारी मिळवली होती. यामुळे आता चीनला धडा शिकविण्यासाठी या कंपनीकडून ऑर्डर देऊ नये असे निदर्शकांनी म्हटले आहे.
एक कर्मचारी म्हणाला, एकीकडे चिनी कंपन्या भारताकडून नफा कमवत आहेत तर दुसरीकडे आमच्या सैनिकांवर हल्ले होत आहेत. ते आमची जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सहन केले जाणार नाही. आम्ही भुकेने मरण्यासाठी तयार आहोत, परंतु चिनी कंपनीने गुंतवणूक केलेल्या कंपनीत आम्ही काम करणार नाही.