जेईई, नीट परीक्षा रद्द केल्यास शैक्षणिक वर्षच वाया,

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बिगर कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री जेईई, नीट परीक्षेवरून राजकारण करत वर्ष पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्यामुळे केवळ एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसून पुढील काही वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

विशेष प्रतिनिधी


नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बिगर कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री जेईई, नीट परीक्षेवरून राजकारण करत पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्यामुळे केवळ एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसून पुढील काही वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

जेईई, नीट या परीक्षा दिवाळीनंतरच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलायचा निर्णय घेतला तर संपूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाईल. त्याचा परिणाम येत्या काही वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेवर होईल. त्यामुळे या दोन्ही परीक्षा यंदा वेळेवर घेणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी व्यक्त केले.

खरे म्हणाले की, जेईई (मेन) व नीट या दोन परीक्षा यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणार होत्या. चीनी व्हायरसच्या साथीमुळे त्या परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले. आता या परीक्षा दिवाळीनंतरच घ्या, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत.  
 
दिवाळीनंतर उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी छटचा उत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. समजा त्याच्या एक आठवड्यानंतर जेईई (मेन) व नीट या परीक्षा घ्यायचे ठरविले तर त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या लागतील व त्याचे निकाल पुढील वर्षी जाहीर होतील. म्हणजे एक पूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाण्याचा धोका आहे.

2021 वर्षातील प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी पूर्वी होत्या तितक्याच जागा राहणार आहेत. त्यांची संख्या दुप्पट होणार नाही याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच यंदाचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे थोडे उशिरा का होईना; पण नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे आहे. यंदाची शैक्षणिक सत्रे कमी कालावधीची व कमी सुट्यांची राहतील; पण ऑगस्ट २०२१ मध्ये पुढील बॅच दाखल व्हावी, असे उद्दिष्ट आम्ही राखले आहे. सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे खरे यांनी सांगितले.  

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*