चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांनी दिला ७२ तासांचा फॉर्म्युला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी ७२ तासांचा फॉर्म्युला दिला आहे. सुरुवातीच्या 72 तासांमध्येच संक्रमण असल्याचे लक्षात आले तर संक्रमणाची गती कमी होऊ शकते. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी ७२ तासांचा फॉर्म्युला दिला आहे. सुरुवातीच्या 72 तासांमध्येच संक्रमण असल्याचे लक्षात आले तर संक्रमणाची गती कमी होऊ शकते. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या  स्थितीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्यासह  10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, तामिळनाडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सहभागी झाले.

पंतप्रधान म्हणाले, चीनी व्हायरसचा  संसर्ग ओळखण्यास आणि रोखण्यात मदत मिळत आहे. सक्रिय प्रकरणांची टक्केवारी कमी झाली आहे. रिकव्हरी रेट सातत्याने  सुधारत आहे. आपले प्रयत्न काम करत आहेत, हाच याचा अर्थ आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामुळे लोकांमध्ये विश्वास आणि आत्मविश्वास वाढला आहे, भीतीचे वातावरणही कमी झाले आहे. तज्ञ म्हणत आहेत की जर त्यांनी पहिल्या 72 तासात संसर्ग ओळखला तर संसर्ग कमी होऊ शकतो.

72 तासात, संक्रमित व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांचीही तपासणी केली पाहिजे. वारंवार हात धुणे, कोठेही न थुंकणे, मास्क लावणे याविषयी लोकांमध्ये एक नवीन मंत्र पोहोचवण्याची गरज आहे.

चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, आपण मृत्यूदर एक पेक्षा कमी करण्याचे जे लक्ष्य ठेवले आहे, त्यावर थोडे प्रयत्न केले तर यश मिळेल. ज्या राज्यात टेस्टिंग कमी आणि पॉझिटिव्ह केस जास्त आहे. तिथे चाचणी वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*