चीनी लष्कराला मोठा झटका, भारतीय जवान पोहोचले सर्वात उंच डोंगरावर

भारतीय लष्कराच्या जवानांनी पँगाँग सरोवराच्या परिसरात असलेल्या लडाखमधील फिंगर ४ भागातील सर्वात उंच डोंगरावर ताबा मिळवला आहे. या डोंगरावरून पँगाँग भागातील चिनी सैन्याच्या संपूर्ण हालचालींवर बारकाई लक्ष ठेवता येणार आहे. चीनी लष्कराला हा मोठा झटका आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या जवानांनी पँगाँग सरोवराच्या परिसरात असलेल्या लडाखमधील फिंगर ४ भागातील सर्वात उंच डोंगरावर ताबा मिळवला आहे. या डोंगरावरून पँगाँग भागातील चिनी सैन्याच्या संपूर्ण हालचालींवर बारकाई लक्ष ठेवता येणार आहे. चीनी लष्कराला हा मोठा झटका आहे.

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषवर मोठ्या प्रमाणावर सैनिक आणून ठेवले आहे. मात्र, भारतानेही चीनच्या प्रत्येक कुरघोडीला उत्तर देण्याची तयार केली आहे. उंचीवरील युद्धात पटाईत असलेले भारतीय लष्कर लडाखमधील आघाडीच्या चौक्यांवर तैनात आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील दोन्ही बाजूंनी आपल्या जवानांची संख्या वाढवली गेली आहे आणि सुरक्षा बळकट केली आहे.

चिनी सैन्याने भारतीय जवानांना उंच डोंगरांवरून हटण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यात चीन्यांना यश आले नाही. पँगाँग सरोवराच्या उत्तर, दक्षिण दिशेला चिनी सैनिक आणि वाहनांच्या हालचाली वाढल्या आहेत.

काही ठिकाणी अवजड शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैनिकही अगदी जवळ तैनात आहेत. भारतीय लष्कराने पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तरेकडील दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या आणि उंच डोंगरांचा ताबा घेतला आहे. यामुळे चिनी सैन्य बिथरले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*