चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर, हवाई दल, जवान सीमेवर सज्ज


चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश या भागांत हवाई दल व लष्कराचे जवान सज्ज ठेवले आहे. चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश या भागांत हवाई दल व लष्कराचे जवान सज्ज ठेवले आहे. चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.

भारतीय जवानांनी शौर्याची परिसिमा केली. गलवान खो-यात चीनच्या ४५ सैनिकांना कंठस्नान घातले. तरीही चीनची खुमखुमी उतरली नाही.

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमेवर लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. मात्र विश्वासघाताची परंपरा कायम ठेवत लष्करी पातळीवरील चर्चेबरोबरच चीनने राजनैतिक पातळीवरील चर्चेस तयार असल्याचेही चीनने म्हटले आहे. मात्र, गलवान खोरे, पेंगाँग सरोवर या भागांतून चीनने सैन्य मागे घ्यावे, ही भारताची अट आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मंगळवारी रशिया, चीन व भारत यांच्यात होणार्या त्रिपक्षीय चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आधी या चर्चेत सहभागी न होण्याचे भारताने ठरविले होते. पण रशियाच्या विनंतीमुळे सहभागी होण्याचे ठरले. चीन व भारत यांच्यात समझोता घडवून आणण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

१५ जून रोजी गलवान खो-यात चीनच्या सैनिकांनी अत्यंत क्रूर व रानटी पद्धतीने भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यामुळे भारतात संतापाचे वातावरण आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यामुळे भारताच्या बाजुने जनमत आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स हे देश पूर्णपणे भारताच्या बाजूने उभे ठाकले आहेत. आपले ४५ सैनिक त्या रात्री ठार झाल्याचे उघड झाल्याने चिनी नागरिकही सरकारवर अतिशय नाराज आहेत.

लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सोमवारी सर्व विभाग कमांडरशी याबाबत चर्चा केली. कोणत्याही सूचना येण्याची वाट पाहू नका, चीनने कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना सर्व शस्त्रे व ताकदीनिशी प्रत्युत्तर द्या, असे सांगण्यात आले आहे. भारताने सुखोई, मिराज 2000 ही लढाऊ विमाने तसेच अपाचे, चिनूक ही हेलिकॉप्टर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी आणून ठेवली आहेत. सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेट गोळीबार करण्याचे अधिकार भारतीय लष्कराला दिले आहेत. त्यामुळे बिथरलेल्या चीनने भारतीय गोळीबाराचा सामना करण्यास सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती