चिनी सैन्याच्या कुरापतींमुळेच भारत – चीन सीमेवर तणाव


  •  चीनचा शेजारी राष्ट्रासोबत वाईट दृष्टीकोन : परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ
  •  माओवादी कम्युनिस्ट चीनला जगातली लोकशाही संपवायची आहे

वृत्तसंस्था

कोपेनहेगन : भारत – चीन हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधी धार तीव्र केली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) त्यांच्या शेजारी राष्ट्रांविषयी वाईट दृष्टिकोन बाळगत आहे. त्यातूनच चिनी सैन्य भारताशी हिंसक संघर्ष निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला. कोपेनहेगन डेमॉक्रसी समिट २०२० मध्ये ते बोलत होते. चिनी माओवादी कम्युनिस्ट राजवटीवर त्यांनी सडकून टीका केली.

लोकशाही सरकार कमकुवत करण्यासाठी सायबर मोहिमेद्वारे कम्युनिस्ट चीन हा अमेरिका आणि युरोपमध्ये खोटा प्रचार करत आहे. चीन विकसनशील देशांना चीनवरील अवलंबत्व वाढवून आणि कर्जाच्या ओझ्याखाली ठेवत अाहे, असा आरोप माईक पॉम्पेओ यांनी केला. चिनी सैन्याच्या कुरापतींमुळेच भारत – चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

पॉम्पेओ म्हणाले, “चिनी सैन्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताशी तणाव निर्माण करण्यात गुंतले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपल्या क्षेत्राचा अवैधरित्या विस्तार करत आहे. आधी करोना व्हायरसबद्दलही चीन खोटे बोलला. त्यांनी हा व्हायरस जगातील सर्व ठिकाणी पसरू दिला. आपला हा कट लपवण्यासाठी चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला.”

‘कोपेनहेगन डेमोक्रेसी समिट २०२०’ मध्ये ‘युरोप आणि चीनची आव्हानं’ या विषयावर ते म्हणाले, “चीनच्या कम्युनिस्ट विचारधारेत बदल करून चीनमधील लोकांचे जीवनमान उंचावू शकू असा पश्चिमी देशांना विश्वास होता.

परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) आपल्यासोबत उत्तम संबंध असल्याचा बनाव करत फायदा घेत आहे. चीनला सीसीपीला नाटोसारख्या संस्थांच्या माध्यमातून जगातील निरंतर स्वातंत्र्य आणि वाढ संपुष्टात आणण्याची इच्छा आहे. त्यांना केवळ चीनला फायदा होणारे नियम आणि कायदे अवलंबण्याची इच्छा आहे. सीसीपीने संयुक्त राष्ट्रात केलेला करार मोडून हाँगकाँगचे स्वातंत्र्य संपविण्याचा निर्णय घेतला आहे.”

चीन हाँगकाँग प्रकरणात काय करत आहे, त्याचे फक्त एक उदाहरण आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केले आहे. चीन मानवी हक्कांचे उल्लंघन करत उइगर मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा आरोपही पॉम्पेओ यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती