चिनी अ‍ॅपची वकिली करणार नाही; टिक टॉकची केस घेण्यास मुकूल रोहतगी यांचा नकार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – चीन सीमेवरील तणावामुळे देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण आहे. भारत सरकारने टिक टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना आता माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात टिक टॉक अ‍ॅपची बाजू मांडण्यास नकार दिला आहे. चीनी अ‍ॅपची वकिली करणार नाही, असे रोहतगी यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “भारत सरकारने बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅप्सच्या बाजूने मी खटला लढणार नाही. चीनने भारत विरोधी कारवाया केल्या आहेत. चीनविरोधात देशभर संतापाची लाट आहे. एका चिनी अ‍ॅपसाठी भारत सरकारविरोधात मी लढणार नाहीच.” एएनआयने याबाबत बातमी दिली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*