घाबरलेल्या पाकिस्तानी लष्कराने रुग्णालयात अर्धे बेड आरक्षित ठेवण्याची केली मागणी

भारत आणि चीनमधील तणावाचा फायदा घेऊन सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला भारताने चांगलाच धडा शिकविला. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व रुग्णालयांत सैनिकांसाठी पन्नास टक्के बेड राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : भारत आणि चीनमधील तणावाचा फायदा घेऊन सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला भारताने चांगलाच धडा शिकविला. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्कराने पाकव्याप्तप्त काश्मीरमधील सर्व रुग्णालयांत सैनिकांसाठी पन्नास टक्के बेड राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीच ही मागणी केली आहे. बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की सैनिकांसाठी बेडची व्यवस्था तयार ठेवा. त्याचबरोबर ब्लड बँकेत पुरेसा रक्तसाठा असेल याचीही काळजी घ्या.

भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यावर पाकिस्तानला ही संधी वाटली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी युध्दविरामचे उल्लंघन केले होते. परंतु, भारतीय लष्कराने त्यांना चांगलीच अद्दल घडविली. त्यामुळे पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले.

पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादीही भारतीय सीमेत घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारतीय लष्कराने हा डावही हाणून पाडला आहे. काश्मीरच्या त्राल परिसरात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्रान घातले. भारतीय सैन्याचा भडीमार आणि त्यातून कोरोनाचा कहर अशा दुहेरी कात्रीत सापडल्याने पाकिस्तानी सैन्याचे मनोबल खचले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*