गोदावरीचे प्रदुषण करणाऱ्यांवर सहा महिन्यात ८८ गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदुषण केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यात ८८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती गोदावरी प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिली. यासाठी नियुक्त समितीची बैठक काल झाली, त्यात विविध बाबी ठळकपणे मांडण्यात आल्या.

एमआयडीसीमधील कंपन्यांचे दुषीत पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदी प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फेत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. तसेच नाशिकरोड परिसरातील नागरीकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

पिंपळगाव खांब आणि तपोवन खालच्या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथील जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फेत संपादित केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असल्याने गोदावरी प्रदुषण समितीची ऑनलाइन पध्दतीने आढावा बैठक विभागीय आयुक्तालयात झाली.

बैठकीत गोदावरी नदी प्रदुषण करणाऱ्यांवर मुंबई कायद्यानुसार गेल्या सहा महिन्यात ८८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कायद्यातर्गत सन २०१६ पासून ते १९ ऑगस्टपर्यत ३हजार ८५६ गुन्ह्यांच्या नोंदीनुसार ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिली

नाशिकरोडला शुध्द पाणी द्या

नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदुषण विरहित करणे,वालदेवी नदीमधील होणाऱ्या प्रदुषणावर जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी मिळून केलेल्या उपाययोजना व कार्यवाहीची माहिती यावेळी देण्यात आली.त्यामध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फेत सिव्हील ट्रिटमेंट प्लॅन्ट(एसटीपी) तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती मनपा कार्यकारी अभियत्यांनी दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*