खडसेंच्या दणक्यानंतर हलली यंत्रणा,कोविड सेंटरचा भोजन ठेका रद्द

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोना रूग्णांच्या उपचारावर शासन लाखो रूपये खर्च करत आहे. रूग्णांना औषधोपचार,जेवन इतर बाबींवर हा खर्च केला जात आहे, मात्र मुक्ताईनगर येथील श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनातर्फे कोविड सेंटरमध्ये रूग्णांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याची ओरड आहे.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सोमवारी थेट कोविड रूग्णालयात धडक देत रूग्णालय प्रशासनाला जाब विचारला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. अखेर रोहिणी खडसेंच्या दणक्यानंतर आणि माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या सूचनेवरून जेवनाचा ठेका रद्द करण्यात आला आहे.

कोरोना रूग्णांच्या उपचारावर शासन लाखो रूपये खर्च करत आहे. रूग्णांना औषधोपचार,जेवन इतर बाबींवर हा खर्च केला जात आहे मात्र मुक्ताईनगर येथील श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनातर्फे कोविड सेंटरमध्ये रूग्णांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड आहे. जेवनात अळ्या आढलून आल्याच्या तक्रारी आहेत, असे निकृष्ट जेवन दिले तर रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रूग्ण दगावल्याची शक्यता निर्माण होऊ सकते.रूग्णांनी याबाबत जेवन देणाऱ्या ठेकेदार यांना विचारणा केली असता तुम्हाला आणखी दहा दिवस काढायचे आहेत,असे धमकीवजा उत्तर देण्यातच येत असल्याच्या तक्रारी रूग्णांनी केल्या आहेत.

रोहिणी खडसेंकडे तक्रार

संबंधीत ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या निकृष्ट जेवनाबाबत एका रूग्णाने जळगाव जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा अँड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे तक३र केली असता रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांना घेऊन भाजप पदाधिकारी यांच्यासह थेट कोविड सेंटर गाठले. यावेळी तेथे असलेल्या रूग्णांनी बाहेर येऊन खिडक्यांमधून त्यांना मिळालेले निकृष्ट दर्जाचे जेवन दाखविले व दुपारी तीनपर्यत जेवन मिळाले नसल्याचे सांगितले.

नाथाभाऊंनीही दिली भेट

याबाबत रोहिणी खडसे यांनी कोविड सेंटरमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संवाद साधून तक्रार केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवी करण्याबाबत आश्वासन दिले. माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तहसीलदारांना यांना तात्काळ कारवाई करून रूग्णांच्या समस्या सोडविण्याचे सांगितले. जेवन,औषधोपचार व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर खडसे यांनी तहसीलदारांसह कोविड सेंटर गाठले, गेटवर दोन तास उभे राहून जोपर्यत समस्या सुटत नाही तोपर्यत मागे हटणार नाही,अशी भूमिका घेतली. अखेर नाथांबाऊंनी भेट दिल्यानंतर तहसिलदारांनी भोजन पुरवठादारांचा ठेका रद्द केल्याचे सांगितल्यावर दोन तास चालले आंदोलन थांबविण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*