कोरोना रोखण्यात अपयशानंतर भुजबळांची पुन्हा लॉकडाऊनची तंबी


मनसेने ठेवलेल्या ठपक्यावर मात्र चकार शब्द नाही


विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोना रूग्णांच्या संख्येत नाशिकमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करावे, आठवडाभरात नियंत्रण न मिळविल्यास जिल्ह्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. पुन्हा लॉकाऊन करावे लागेल, अशी तंबी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.

मनसेनेही आज पत्रकार परिषद घेत पालकमंत्र्यांच्या अपयशाचा पाढा नाशिककरांसमोर मांडला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येवला तालुक्यात घरोघरी होणारे सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेन्मेट झोनमध्ये कडक नियोजन करण्यात आले.

मास्क न वापरणाऱ्यासह नियमांचे पालन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. जर एवढे करूनही नागरीक ऐकत नसतील तर वेळेप्रसंगी पूर्ण जिल्ह्याच लॉकडाऊन केले जाईल, लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येत आहे. ऑक्सिजन बेडसवर डीसीएचसीमध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रूग्णांना ठेवून समुपदेशन करण्यात यावे, असे ते म्हणाले.

काळाबाजार, लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई

खासगी रूग्णालये व आरोग्ययंत्रणेकडून नाशिककरांची होणाऱ्या लुटीबद्दल बोलतांना ते म्हणाले, “कर्जमाफीची रक्कम योग्यपणे वितरित न करणे तसेच अव्वाच्या सव्वा मेडिकल बिल आकारून नाशिककरांची लुट केल्यास तसेच एकमेकांचे लिंकिंग असल्याचे आढळल्यास कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला. आपल्यावर झालेल्या आरोप फेटाळून त्यांनी अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा केविलवाला प्रयत्न नाशिककरांसाठी आता नवा राहिलेला नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती