कोरोनाचा प्रभावी मुकाबला करण्याचे निर्णय केबिनमध्ये बसून नव्हे, तर जनतेच्या सूचनांना अनुसरून घेतले

  • जनतेच्या लढ्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची चांगली स्थिती : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या देशात करोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली अाहे. केंद्र सरकारने एसी केबिनमध्ये बसून नव्हे, तर जनतेकडून आलेल्या सूचना स्वीकारून निर्णय घेतले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटिन यांच्या ९० व्या जयंती कार्यक्रमात विडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “या वर्षाच्या सुरूवातीस काही लोकांचा असा अंदाज होता की भारतात करोना विषाणूचा परिणाम खूप तीव्र स्वरूपाचा असेल. लॉकडाऊन, सरकारने घेतलेले पुढाकार आणि जनतेनेचा लढा या सर्व प्रयत्नांमधून भारतात इतर देशांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे.”

दिल्लीतील आरामदायी सरकारी कार्यालयांमधून नव्हे तर लोकांच्या अभिप्रायानंतर आम्ही निर्णय घेतले,” असे मोदी स्पष्ट करून मोदी म्हणाले, “भारतात इतर राष्ट्रांच्या तुलनेत स्थिती चांगली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. कोणाचीही मृत्यू होणे ही दुर्देवी बाब आहे. देशात एक दशलक्ष लोकसंख्येमागे १२ मृत्यूंची नोंद आहे. तर इटलीमध्ये हाच दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे ५०० इतका आहे. लोकांच्या सहकार्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्यासारखे प्रकार आपल्याला करायला हवेत.

सरकारच्या उज्ज्वला योजनेतून ८ कोटींहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करण्यात आलं आहे. त्यांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहे. बेघरांना आश्रय देण्यासाठी दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली आहेत. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना अाहे. कोट्यवधी जनतेला तिचा लाभ होतोय, असे मोदी यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*