कॉंग्रेसी मित्रांनो…बालिशपणा सोडा; मोदींच्या लडाख भेटीवरुन संभ्रम निर्माण करणाऱ्यांना टोला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौर्‍याच्या एका दिवसानंतर त्यांच्या रुग्णालयातील सैनिकांसमवेतच्या फोटोंवरुन अनेकांनी संभ्रम माजवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी खोटे हॉस्पिटल तयार केले गेले, असे सांगितले जाऊ लागले आहे. एवढेच नव्हे तर टोकाच्या मोदी द्वेषातून चक्क भारतीय सैन्याच्या धैर्यावर आणि शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापर्यंतही काहींची मजल गेली आहे.

भारतीय सैन्याच्या धैर्याकडे बोट दाखवण्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आघाडी घेतली आहे. मात्र यावर कॉंग्रेसच्याच संजय झा यांनी घरचा आहेर देत त्यांच्या कॉंग्रेसी मित्रांना बालिशपणा सोडण्याचे आवाहन केले आहे.

“स्टेज्ड” हॉस्पिटल वॉर्ड वापरणारी ही “मार्केटींग नौटंकी” आहे की वास्तविक वैद्यकीय सुविधा आहेच, याबद्दल आश्चर्यचकित होणारी ट्वीट कॉंग्रेसकडून केली गेली. स्वीडनमधल्या एका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अशोक स्वाईन यांनीही ट्विट केले की, “मी फक्त एकल वैद्यकीय उपकरणाशिवाय फक्त बेड असलेली हॉस्पिटल कधीच पाहिली नाही.”

सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या या अफवांच्या पार्श्वभूमीवर अखेरीस संरक्षण मंत्रालयाला खुलासा करावा लागला. त्यानंतरही दुर्दैवाने भारतीय सैन्यावर संशय व्यक्त करणे अनेकांनी थांबवलेले नाही.

Faking malicious comments forced Army to give clarification.

ज्यांनी “दुर्भावनायुक्त आणि निरुपयोगी” अफवा पसरवल्या आहेत त्यांची निंदा करताना संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, “कोविड भागातून सैनिकांना अलग ठेवणे सुनिश्चित करण्यासाठी गलवानहून आल्यापासून जखमी झालेल्या शुरवीरांना तिथे ठेवण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे आणि लष्कर कमांडर यांनीही त्याच ठिकाणी जखमी शुरवीरांना भेट दिली.”

“ही सुविधा शंभर बेडच्या संकटकालीन विस्तार क्षमतेचा भाग आहे आणि जनरल हॉस्पिटल कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे,” असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यानंतर सोशल मीडियातील नेटकऱ्यांनी कॉंग्रेसच्या अपप्रचारावर जोरदार टीका चालू केली. देशापुढे खोटे कथन केल्याबद्दल कॉंग्रेस आणि इतर समर्थकांना नेटकऱ्यांनी झोडपून काढले आहे.

विशेष म्हणजे यात कॉंग्रेस नेते संजय झा यांचाही समावेश आहे. झा यांनीही स्वपक्षियांना चार गोष्टी सुनावल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते संजय झा यांनी म्हटले की, त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी त्यांना अत्यंत निराश केले. “माझ्या पक्षाचे काही सदस्य बनावट बातम्यांच्या माध्यमातून अपप्रचाराच सहभागी होतात याबद्दल मी फार निराश झालो आहे. आम्ही इतकी वर्षे याचसाठी भाजपवर टीका करीत आलो आहोत.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे हे वर्तन बेजबाबदार आहे, लाजिरवाणे आहे. मला काळजी वाटते की ट्रोलिंगमध्ये पीएचडी मिळविण्यासाठी आम्ही इतके उत्सुक झाले आहोत….हा बालिशपणा सोडा! ” या आशयाचे ट्वीट संजय झा यांनी केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*