कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर हकालपट्टीची कुऱ्हाड पडणार


कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच उफाळून आला आहे. मात्र, या नव्या जुन्यांच्या वादात अनेक प्रदेशाध्यक्षांवर हकालपट्टीची कुऱ्हाड पडणार आहे. यामुळे कॉंग्रेसच्या एका गटात प्रचंड नाराजीची भावना आहे. हस्तीदंती मनोऱ्यातून राहुल गांधी काम करत असताना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका होत आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच उफाळून आला आहे. मात्र, या नव्या जुन्यांच्या वादात अनेक प्रदेशाध्यक्षांवर हकालपट्टीची कुऱ्हाड पडणार आहे. यामुळे कॉंग्रेसच्या एका गटात प्रचंड नाराजीची भावना आहे. हस्तीदंती मनोऱ्यातून राहुल गांधी काम करत असताना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका होत आहे.

कॉंग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या दारुण पराभवानंतर राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, कॉंग्रेसने अन्य कोणाला या पदावर संधी दिली नाही. उलट राहूल गांधी यांच्यासाठी जागा कायम ठेवण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची नाही, परंतु पडद्याआडून पक्षावर पूर्ण कब्जा ठेवायचा अशी राहुल गांधी यांची योजना आहे.

यासाठी त्यांच्यासोबतची ब्रिगेड ज्येष्ठ नेत्यांवर दोषारोप करत आहेत. अगदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यांनी सोडलेले नाही. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राहुल गांधी ब्रिगेडमधील खासदार राजीव सातव यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर आगपाखड केली होती. कॉंग्रेसचे सरकार असताना या मंत्र्यांनी काय काम केले, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे निर्माण झालेला वाद सोशल मीडियावरही चर्चीला गेला.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करीत आहेत. केंद्रीय स्तरावरील फेरबदलासोबत काही प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे. अनेक वरिष्ठ सरचिटणीसांना दुसरी जबाबदारी देऊन युवा नेत्यांकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागासाठीही वेगळेवेगळे उपाध्यक्ष नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या सगळ्यामध्ये युवा नेतृत्वाच्या नावाखाली ज्येष्ठांवर तीर मारण्याची तयारी असल्याचेही म्हटले जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था