कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानात, कार्यकर्त्यांतील मरगळ दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

नाशिक : महापालिका स्तरावर सुरु असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी,सिवसेना नेत्यांच्या शहरात नियमित बैठका सुरु आहेत. सरीकडे कॉग्रेस संघटनेच्या पातळीवर कोणत्याही हालचाली नसल्याने शहरासह जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची भावना पसरली आहे.

हि मरगळ दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तुपसाखरे लॉन्स येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत मते जाणून घेतली. त्यानतर पत्रकाराशी संवाद साधतांना त्यांनी महाआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्याने विरोधी पक्ष म्हणते म्हणून हे सरकार पडणार नसून,आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारच,अशी ग्वाही दिली.

राजीनामा मागणे हा भाजपाचा डाव

विधानसभा निवडणूकीनंतर कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे पाच महिन्यापासून कार्यकर्त्यांशीसंवादच राहिला नव्हता. यासाटी शहर कॉग्रेसची आढावा बैठक घेण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले.

शहर कॉग्रेसच्या नेतृत्वात बऱ्याच दिवसापासून होत असलेल्या बदलाच्या मागणीबाबत विचारले असता याबाबत विचारविनिमय सुरु सल्याचे तयांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मागितला जात असल्याबद्दल ते म्हणाले की,चव्हाण माजी मुख्यमंत्री, कॉग्रेसचे जेष्ठ नेते असून मराठा आरक्षणाबाबत शंभर टक्के चांगले काम करत आहेत.

त्याचा राजीनामा मागणे हा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचे वक्तव्य,अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या याविषयी बोलण्याचे टाळत,एका प्रश्नांच्या उत्तरादाखल त्यांनी कोरोनाच्या प्रभावामुळे जगरातील महसुली उत्पन्नात घट होत असल्याकडे लक्ष वेधले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*