कॉंग्रेसमध्ये अशीही लोकशाही, वेगळे मत मांडणा‌रया संजय झा यांची हकालपट्टी


विरोधी मत व्यक्त करणे ही पक्षातील जीवंत लोकशाहीचे लक्षण. त्याचा पक्षश्रेष्ठींनीही आदर करायचा असतो अशी शिकवण कॉंग्रेसमधील अनेक नेते उठता-बसता देत असतात. परंतु, याच पक्षाकडून केवळ वेगळे मत व्यक्त केले, अंतर्गत लोकशाहीची आवश्यकता आहे असे म्हटले म्हणून म्हणून प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या नेत्याला काडून टाकण्यात आला.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : विरोधी मत व्यक्त करणे ही पक्षातील जीवंत लोकशाहीचे लक्षण. त्याचा पक्षश्रेष्ठींनीही आदर करायचा असतो अशी शिकवण कॉंग्रेसमधील अनेक नेते उठता-बसता देत असतात. परंतु, याच पक्षाकडून केवळ वेगळे मत व्यक्त केले, अंतर्गत लोकशाहीची आवश्यकता आहे असे म्हटले म्हणून म्हणून प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या नेत्याला काडून टाकण्यात आला.

कॉँग्रेसचे नेते संजय झा हे चॅनलवरील चर्चेत अनेकदा पक्षाची भूमिका मांडताना दिसायचे. अनेक वेळा अडचणीच्या प्रश्नांचाही सामना करायचे. परंतु, पक्षामध्ये अंतर्गत पातळीवर काही गोष्टींवर चर्चा करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यात एक लेख लिहून पक्षाच्या काही धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.

त्यामुळे प्रवक्तेपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. आता तर त्यांना थेट पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी राजस्थानातील सत्तासंघर्षात सचिन पायलट यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

पायलट यांच्यावर कारवाई होण्याअगोदर ते पक्षातीलच एक नेते असल्याने त्यांचे समर्थन करण्यात गैर काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पायलट हे राजस्थानात कॉँग्रेसचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत,  हे त्यांनी आकडेवारीवरून मांडले होते. यामुळेच त्यांच्यावर श्रेष्ठींची खप्पा मर्जी झाली आणि पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती