केंद्राने जाहिरातींवर बंदी घातल्यानंतर पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रात बंदी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल. नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठाने हे औषध तयार केले असून मंगळवारी ते लाँच करण्यात आले. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.

हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते.

सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आले. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही कोरोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागाने केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती.

करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असे परवाना अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती