कृषीमंत्री दादा भुसे यांची अशीही `शो`बाजी


विशेष प्रतिनिधी

नाशिक : भपकेबाजपणा,दिखाऊपणा दाखविण्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याइतकेच कृषीमंत्री दादा भुसे हे आघाडीवर असतात किंबहुना कार्यक्रम,सण,उत्सव व भेटीदरम्यानची अशी एकही संधी मिळाली तर ती संधी ते कधीच सोडत नाही. दोन दिवसांपुर्वी मालेगावहुन नाशिकला जात असतांना कोकणगाव येथे महामार्गावर शेतकरी ताजा भाजीपाला विकतांना दिसताच गाडी थांबून शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी धावले. ही शो बाजी म्हणायची की खरोखरच भुसे यांना शेतकरी प्रश्नी एवढा कळवळा आहे, हे मात्र न सुटणारे कोड़े होते.

कृषीमंत्री भुसे यांनी कोकणगाव(ता.निफाड) येथील स्थानिक शेतकरी बंधु तथा वारकरी सांप्रदायिक लक्ष्मण मोरे हे महामार्ग शेजारी छत्रीच्या सानिध्यात शेतकरी ते ग्राहक या पध्दतीचा थेट अवलंब करून ताजा भाजीपाला विकी करतांना पाहिले. यावेळी मंत्रीमहोदयांनी काही क्षण थांबून त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी शेती मालाची कोरोनाच्या महामारीत झालेली परवड व पिकलेला शेतीमाल विकण्यासाठी होणारे हाल मिळणारा बाजारभाव या विषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली.

आत्मनिर्भर झाल्यास शेती व्यवसायालाही चांगले दिवस

शेतकऱ्यांनी कोरोना काळात थेट ग्राहक गाठून आडत्यांना डच्चू दिला आहे. पुढील काळातही शेतकरी असा आत्मनिर्भर झाल्यास शेती व्यवसायालाही चांगले दिवस येतील, मोठ्या प्रमाणात माल पिकवणाऱ्याने बाजारपेठेत वर्चस्व दाखवावे. श्री.लक्ष्मण मोरे हे त्यांच्या शेतातील स्वतः उत्पादित केलेला ताजा भाजीपाला ग्राहकांसाठी दैनंदिन उपलब्ध करून देतात. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला मिळत असल्याने स्थानिकांना त्यांचा निश्चित फायदा होत आहे.

ताजा व स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची पिळवणूक थांबली व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आली.असे शेतकरी सांगतात, हे खरं असलंतरी कृषीमंत्र्याच्या या शो बाजीबद्दल काय बोलायचे हा प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे.,

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था