कुलपती म्हणून राज्यपालांच्या अधिकारांवर डाका, महाविकास आघाडी सरकारचा डाव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे कुलपती या नात्याने असलेल्या त्यांंच्या अधिकारावर डाका टाकण्याचा डाव सरकारने आखला आहे. कुलगुरू निवडीचे राज्यपालांना असलेले अधिकार काढून घेण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे कुलपती या नात्याने असलेल्या त्यांंच्या अधिकारावर डाका टाकण्याचा डाव सरकारने आखला आहे.

कुलगुरू निवडीचे राज्यपालांना असलेले अधिकार काढून घेण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. ते रा. स्व.संघ परिवाराशी संबंधित आहेत. भविष्यात त्यांच्याप्रमाणेच अन्य विद्यापीठांच्या कुलगुरुपदीदेखील संघ परिवारातील व्यक्तींची नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे धास्तावून जाऊ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी राज्य शासनाला असले पाहिजेत, अशी मागणी नितीन राऊत, सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या तीन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. दरम्यान, यापुर्वी देशातल्या अनेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसने पदनिवडींमध्ये काय पद्धतीचे राजकारण केले, याचा मात्र सोईस्कर विसर यावेळी पडल्याचे दिसले. विचारधारेपेक्षाही पदांचा ‘बाजार’ करता येत नसल्याची खंत यामागे जास्त असल्याचेही बोलले जात आहे.

राजभवनला कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार असू नयेत यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भात कायदेशीर चाचपणी केली जात आहे. पाच सदस्यांच्या समितीने पाच जणांच्या नावाची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शिफारस केली होती. त्यातील एकास नियुक्त करण्याचे अधिकार कायद्यानुसार राज्यपालांना असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाचही जणांची मुलाखत घेऊन डॉ. सुभाष चौधरी यांची निवड केली होती. संघ विचारांच्या व्यक्तींना कुलगुरुपदी नियुक्त केले की मग ते त्याच विचाराने विद्यापीठाचा कारभार करतात आणि पक्षपात करतात असा अनुभव असल्याची तक्रार तीन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*