कुरापतखोर चीनला अमेरिकेचा दणका; हुवैई आणि झेईटी कंपन्यांवर बंदी

कुरापतखोर चीनला भारताने धक्का दिल्यानंतर त्याचेच अनुकरण करत अमेरिकेनेही मोठा दणका दिला आहे. चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांकडून देशाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याने अमेरिकेत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कुरापतखोर चीनला भारताने धक्का दिल्यानंतर त्याचेच अनुकरण करत अमेरिकेनेही मोठा दणका दिला आहे. चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांकडून देशाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याने अमेरिकेत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.

भारताने चीनी कंपन्यांच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी आणल्यानंतर अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे आता जगातील इतर देशही चीनविरुध्द कारवाई सुरूवात करतील.

हुवैई टेक्नोलॉजी आणि झेडटीई कॉर्प या कंपन्यांना अमेरिकेने व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनने मंगळवारी या कंपन्यांना देशासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन सरकारने या कंपन्यांसोबत करारदेखील केला होता. या करारानुसार, ८.४ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू, उपकरणे खरेदी करण्यात येणार होते. मात्र, यासाठीचा निधी थांबवण्यात आला आहे. टेलिकॉम कंपन्यांना आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून या दोन्ही कंपन्याच्या उपकरणांना हटवावे लागणार आहे.

अमेरिकेच्या सुरक्षितेसोबत कोणतीही जोखीम घेणार नसल्याचेही कमिशनने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी एक आदेश काढला होता. या आदेशानुसार, ज्या कंपन्यांमुळे देशाच्या सुरक्षितेला धोका निर्माण होईल, अशा कंपन्यांसोबत कोणत्याही प्रकारचा टेलिकम्युनिकेशन व्यवसाय करण्यात येणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. अमेरिकेचा हुवैईसोबत आधीपासून वाद सुरू होता. या कंपनीला अमेरिकेने काळ्या यादीतही टाकले होते.

भारताने सोमवारी ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालत चीनला झटका दिला आहे. या अ‍ॅप्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. हे अ‍ॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अ‍ॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता, त्यामुळे केंद्र सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*