कुठल्याही क्षणी कारवाईसाठी तयार राहा, लष्करप्रमुखांच्या सूचना


कुठल्याही क्षणी कारवाईसाठी तयार राहा, अशी सूचना लष्करप्रमुखांनी आपल्या सर्व कमांडरांना दिली आहेत. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास आणि आघाडीवर उच्च पातळीवरील ऑपरेशनल तयारी ठेवण्यास सांगितले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कुठल्याही क्षणी कारवाईसाठी तयार राहा, अशी सूचना लष्करप्रमुखांनी आपल्या सर्व कमांडरांना दिली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास आणि आघाडीवर उच्च पातळीवरील ऑपरेशनल तयारी ठेवण्यास सैन्याला सांगण्यात आले आहे.

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख मनोज नरवणे दोन दिवसांच्या पूर्व कमांडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि सीमेपलिकडील हालचाली कामांवर भारतीय आणि चिनी सैन्याच्या तैनातीची माहिती घेतली.

लष्करासोबतच हवाई दलानेही लडाख, उत्तर सिक्कीम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश क्षेत्रातील संपूर्ण एलएसीवर ऑपरेशनल स्तरावर तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच, कोणत्याही परिस्थितीत त्वरित कारवाईसाठी पूर्णपणे तयार राहावे. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी नुकतीच तेजपूर येथील चौथ्या कोअर मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कमांडर्सना ही सूचना दिली. लष्कराच्या चौथ्या कोअरवर अरुणाचल प्रदेश क्षेत्रातील चीनच्या सीमेवर देखरेखीची जबाबदारी आहे.

पूर्व लडाखमधील तणावाच्या परिस्थितीत चिनी सैन्य एलएसीवर युद्धाची तयारी करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही चीनला कडक प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. चिनी सैन्याने ४ ते ५ संयुक्त सशस्त्र ब्रिगेड तैनात करणे सुरूच ठेवले आहे. लढाईसाठी चीन इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्व लडाखमध्ये चीनच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने एलएसीवर सुमारे ४० हजार जवान तैनात केले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था