काश्मीरी सौंदर्याला हायटेक सिटीचे कोंदण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना

स्वर्गीय सौंदर्याचे वरदान लाभलेल्या काश्मीरला गेल्या काही दशकांपासून दहशतवादाचे ग्रहण लागले होते. मात्र, विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर या दहशतवादाला बऱ्यापैकी आळा घातला गेला आहे. आता येथे विकासाची नवी पहाट उजाडावी यासाठी काश्मीरी सौंदर्याला हायटेक सिटीचे कोंदण देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वर्गीय सौंदर्याचे वरदान लाभलेल्या काश्मीरला गेल्या काही वर्षांपासून दहशतवादाचे ग्रहण लागले होते. मात्र, विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर या दहशतवादाला बऱ्यापैकी आळा घातला गेला आहे. आता येथे विकासाची नवी पहाट उजाडावी यासाठी काश्मीरी सौंदर्याला हायटेक सिटीचे कोंदण देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे.

पंतप्रधानांनी गेल्या एक वर्षांपासून काश्मीरसाठी अनेक योजना राबविण्याचे ठरविले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नया श्रीनगर आणि नया जम्मू या हायटेक आणि पर्यावरणपूरक शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांच्या अंतिम आराखड्यावर  केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिकरीत्या त्यावर देखरेख करत आहेत.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी अनेक योजना आहे. काश्मीरमधील दल सरोवर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग मानले जाते. या सरोवराचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी योजना आखण्यात येत आहेत. या सरोवराभोवती दाट वस्ती असल्याने गेल्या काही वर्षांत त्याचे सौंदर्य कमी झाले आहे. याशिवाय, त्याभोवती अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सरोवराभोवतालच्या भागातील भार कमी करण्याचा योजनेत समावेश असेल.

दल सरोवर ४० टक्के आक्रसले असून, पाण्याचा दजार्ही खालावला आहे असे ड्रेजिंग कॉपोर्रेशन ऑफ इंडियाला आढळल्यानंतर जम्मू- काश्मीर प्रशासनाने दल सरोवराला पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यासाठी गेल्यावर्षी एक समिती नेमली होती. या समितीने फेब्रुवारीत तिचा अहवाल सादर केला आहे. श्रीनगरची संस्कृती, शिल्पकला आणि सौंदर्यदृष्टी यांच्याबाबत संवेदनशीलता बाळगून नव्या शहराची उभारणी व्हावी याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. मात्र याचवेळी, हे टिकाऊ असे हायटेक शहर असेल, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. जम्मू शहरासाठीही नव्या प्रकल्पाची घोषणा होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*