काश्मीरमध्ये हिंसाचाराचा कट, चिन्यांची पाकिस्तानी दहशतवाद्यांची हातमिळवणी

सीमेवर समोरसमोर युध्दात चाळीसहून अधिक सैनिक गमवावे लागल्याने चांगलाच दणका बसल्याने आता चीननेही दहशतवादाचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी चीन्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे.


वृत्तसंस्था

श्रीनगर : सीमेवर समोरसमोर युध्दात चाळीसहून अधिक सैनिक गमवावे लागल्याने चांगलाच दणका बसल्याने आता चीननेही दहशतवादाचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी चीन्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन्यांनी क्रुर हल्यात २० भारतीय सैनिकांना ठार मारले. मात्र, याला भारतीय सैनिकांनी बहादुरीने उत्तर दिले. बिहार रेजीमेंटच्या सैनिकांनी तर गळे दाबून चीन्यांना मारले. यामध्ये ४० हून अधिक चीनी सैनिकांना यमसदनी पाठविले. यामुळे चीनी सैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

त्यामुळे आता समोरासमोरच्या युध्दापेक्षा चीन्यांनी दहशतवादी कारवाया करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांशी मिळून भारताला त्रास देण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. जम्मू आणि काश्मीरात हिंसाचार पसरवण्यासाठी आणि अराजकता माजण्यासाठी काश्मीरात पाकिस्तानची अल बद्र संघटना सक्रीय आहे. 

चिनी अधिकाऱ्यांची पाकव्याप्त काश्मीरात नुकतीच अल बद्रच्या दहशतवाद्यांसोबत बैठक झाली. यामध्ये भारतामध्ये दहशतवाद कशा पध्दतीने पसरविता येईल यावर चर्चा झाली. म्यानमारमधील बंडखोर गटांना भारताने सर्जीकल स्ट्राईक करून उखडून टाकले होते. या दहशतवादी संघटनांनाही भारताविरुध्द साधनसामुग्री पोहोचविणे सुरू केले आहे. म्यानमारच्या अराकन बंडखोर आमीर्ला वित्त पुरवठ्यासह शस्त्र पुरवण्याचे काम सुद्धा चीनकडून केले जात आहे.

म्यानमारच्या अराकन बंडखोरांना होणाऱ्या वित्त पुरवठयापैकी 95% टक्के मदत एकट्या चीनकडून मिळते. चीन दक्षिण आशियात भारताला कमकुवत करण्यासाठी कट रचत आहे. पश्चिम म्यानमारचा भाग भारताच्या सीमेला लागून आहे. याच ठिकाणी चीन वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. भारत दक्षिण आशियामध्ये दुबळा कसा होईल यासाठीच चीनचे कारस्थान सुरू आहेत. म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव वाढू नये असे चीनला वाटते.  

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*