कांग्रेस आमदाराला ग्रामस्थांचाच दणका, मनगुत्तीत पाच महापुरुषांचे पुतळे बसविणार

पोलीसी बळाने ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यास लावणाऱ्या कर्नाटक प्रदेश कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांना मनगुत्ती ग्रामस्थांनी चांगलाच दणका दिला आहे. आता गावात केवळ छत्रपतींचाच नव्हे तर पाच महापुरुषांचे पुतळे बसविले जाणार आहेत.


विशेष प्रतिनिधी 

बेळगाव : पोलीसी बळाने ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यास लावणाऱ्या कर्नाटक प्रदेश कांग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांना मनगुत्ती ग्रामस्थांनी चांगलाच दणका दिला आहे. आता गावात केवळ छत्रपतींचाच नव्हे तर पाच महापुरुषांचे पुतळे बसविले जाणार आहेत.

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिकांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत पाच महापुरुषांचे पुतळे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावात उदभवलेला वाद मिटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महर्षी वाल्मिकी, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान श्रीकृष्ण असे पाच पुतळे लक्ष्मी मंदिराच्या जागेत बसवले जाणार आहेत.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. एका गटाच्या विरोधानंतर जारकीहोळी यांनी पोलिसांना सांगून ग्रामस्थांना शिवाजी महाराजांचा पुतळा काढायला लावला होता. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले होते.

मनगुत्ती ग्रामस्थही आक्रमक झाले होते त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते त्या नंतर रविवारी पंच आणि पोलिसांची बैठक झाली. यामध्ये आगामी आठ दिवसात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढील बैठक मंगळवारी घेण्याचे ठरले होते. त्यानुसार बैठक होऊन पाच पुतळे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे भूमीपुजनही स्थानिक पंचांनी केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*