कंगना म्हणते, मुंबई पोलीसांची वाटते भीती, मलाही सुशांतप्रमाणे पंख्याला लटकावले असते

मुंबईत असते तर मलाही सुशांतसिंह राजपूतसारखे पंख्याला लटकावले असते. मुव्ही माफियांपेक्षा (बॉलिवूड माफिया) मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. बॉलिवूडमधील वाईट प्रवृत्तींविरोधात बोलत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला संरक्षणाची गरज आहे. मात्र हे संरक्षण हिमाचल प्रदेश अथवा केंद्रीय पोलिसांनी द्यावे, अशी मागणी प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत असते तर मलाही सुशांतसिंह राजपूतसारखे पंख्याला लटकावले असते. मुव्ही माफियांपेक्षा (बॉलिवूड माफिया) मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. बॉलिवूडमधील वाईट प्रवृत्तींविरोधात बोलत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला संरक्षणाची गरज आहे. मात्र हे संरक्षण हिमाचल प्रदेश अथवा केंद्रीय पोलिसांनी द्यावे, अशी मागणी प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुंबईत मुंबई पोलिसांनी कंगनाला संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे ट्वीट केले होते. या ट्वीटला रिप्लाय करत कंगनाने पोलीस संरक्षण हवे असले तरी मुंबई पोलिसांची भीती वाटते असे सांगितले. हिमाचल प्रदेश पोलीस अथवा केंद्रीय पोलिसांकडून संरक्षण घेण्याची तयारी कंगनाने दाखवली.

Indian Bollywood actress Kangana Ranaut poses during the launch of a new jewellery range in Mumbai on May 26, 2014. AFP PHOTO/STR

मुंबई पोलीस अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विषयी भीती वाटू लागल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. निर्माता करण जोहर यांना ते आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याने पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले नाही, असा आरोप कंगनाने केला होता.

बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या गटबाजी विरोधात कंगनाने आवाज उठवला होता. नेपोटिझमवर तिने सडकून टीका केली होती. या नंतर कंगनाने बॉलिवूडमधील विशिष्ट धर्माचे स्तोम आणि विशिष्ट धर्मावर बौद्धिक स्वरुपाची टीका या दुटप्पी व्यवहाराचा ‘पदार्फाश’ केला. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे सेवन हा प्रकार दिवसेंदिवस रुळत चालल्याचे सांगितले.

मूळची हिमाचल प्रदेशमधील असलेली कंगना बॉलिवूडमध्ये काम करत असल्यामुळे अनेकदा मुंबईत येऊन-जाऊन असते. कंगनाच्या बेधडक बोलण्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती कंगनाच्या बहिणीने व्यक्त केली आहे. कंगनाने अलिकडेच स्वत:साठी संरक्षण घेणे आवश्यक आहे, असे जाहीर केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*